top of page
Sunil Khatpe Website Banner.png
नवा प्रभाग, नवी दिशा...
सर्वसमावेशक विकासाच्या नव्या पर्वासाठी
आपण सर्व सज्ज होऊया !

प्रिय मतदार माता बंधू-भगिनींनो !

सस्नेह नमस्कार

आपणास सांगू इच्छितो की मी प्रभाग क्र. २५ (ड) शनिवार पेठ महात्मा फुले मंडई मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटातून इच्छुक उमेदवार म्हणून आपणाशी या पत्रकाद्वारे संपर्क साधत आहे.

या पुण्यनगरीत प्रगतीचा ध्यास उराशी बाळगून आजपर्यंत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने मी काम करीत आहे. माझ्या सामाजिक कार्याची पावती आपणाकडून मतदान रूपी मिळावी ही नम्र विनंती.

 

अनेक सामाजिक संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव व मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट, असंख्य कार्यकर्ते यांनी मी पुणे म.न.पाच्या निवडणुकीसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे हे आणि मी सुद्धा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे कारण…

  1. नगरसेवकांना मिळणारे मानधन हे मोलमजुरी व घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत म्हणून देणार आहे.

  2. मला आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करावयाचा आहे.

  3. मला नागरी सुविधांचा सुकरळ राखावयाचा आहे.

  4. करदात्या नागरिकांच्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा असे मला मनोमन वाटते.

  5. प्रभागातील वाहतूक, पार्किंग समस्यांवर उत्तम उपाय करावयाचा आहे.

  6. जुन्या वाड्यांच्या पुनर्रचना, वस्ती विभागाचे पुनर्वसन करावयाचे आहे.

  7. प्रभागातील युवक-युवतींना व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

Sunil Khatpe2.jpeg

माहिती

शैक्षणिक:


ग्रामीण भागातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने १९९९ मध्ये आमच्या कुटुंबियांच्या व मित्र परिवाराच्या मदतीने घारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान ची स्थापना घारेश्वर येथे केली. फक्त ४ मुलींपासून सुरू झालेली संस्थेची वाटचाल आज तब्बल ६५०० पेक्षा जास्त विद्यार्थी अत्यंत चांगल्या प्रकारचे शिक्षण या संस्थेच्या विविध शाखांमधून घेत आहेत. उद्यम हे सिद्धान्त कार्याची नि मार्गदर्शक ही उक्ती समोर ठेवून संस्थेची आता १५व्या अमृतमहोत्सवी वर्षांकडे यशस्वी वाटचाल होत आहे आणि हे संस्कार विद्यार्थ्यावर घडविले जात आहेत. मराठी, सेमी इंग्लिश व इंग्रजी माध्यमातून कन्या शाळा, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय अशा विविध संस्थांमधून हा शिक्षण यज्ञ अखंडपणे चालू आहे. आमचे वडील कै. श्री. बंडोजी खंडोजी चव्हाण यांनी आमच्यावर नेहमीच प्रामाणिकपणे व श्रमाला महत्व देणारे संस्कार घडविले. ‘कष्ट हे केले पाहिजेत, त्यातून तुम्ही तुमचा उज्वल भविष्यकाळ घडवू शकता.’ असे त्यांचे मत होते. कष्टाचे, सच्चोटेपणाचे संस्कार घडविणाऱ्या माता-पित्यांचे ऋण या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सर्व घडविण परिवार, मित्र व हितचिंतकांच्या सहाय्याने फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे.
 

राजकीय:


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष स्थापनेपासून आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब, ना. जयंतरावजी पाटील साहेब व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षामध्ये सक्रिय आहे. प्रथम पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, २००२-२००९ मध्ये पुणे महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, प्लॅनिंग कमिटी सदस्य या नात्याने वडगाव-घारेश्वर परिसरामध्ये अनेक विकासात्मक कामे केली. मला येथे नमूद करताना आनंद होत आहे की राजाराम पूल ते माणिकबाग (सिंहगड रोड) या रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ ही याच काळात झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झटवळ्यासह विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष या नात्याने पक्ष संघटने बरोबरच मतदारसंघातील ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीपर्यंत अखंडपणे पक्षाचे काम करत आलो आहे.
 

सामाजिक:


रेणुका फाउंडेशन: मोफत शालेय साहित्य वाटप, कन्या गर्भ संवर्धन अभियान, वृक्षारोपण सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात माझे काम अविरतपणे सुरूच आहे. भविष्यातील या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी निवारण करून या क्षेत्राचा विकास करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत आणि प्रयत्नशील राहणार आहे. ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या उक्तीप्रमाणे आजतागायत माझी वाटचाल चालू आहे. हे करताना आपले आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा, आपले सहकार्य कायमच मला लाभले, याची मला जाणीव आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या आपल्या परिसरामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत आहे परंतु अजूनही अनेक मुलभूत सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीत. यापूर्वी विविध विकासकामे मार्गी लावली आहेत, अजूनही खूप काही करायचे बाकी आहे. त्यासाठीच येणाऱ्या काळात आपले आशीर्वाद, शुभेच्छा, सहकार्य सदैव राहील हीच अपेक्षा, हीच विनंती.

व्हिडीओ

इतर व्हिडिओ

व्हिडीओ

Our Story

Check back soon
Once posts are published, you’ll see them here.
Image X.png

Be the Change, Lead the Future

  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
  • YouTube
  • TikTok

Contact Us Today

Feel free to reach out to us with any inquiries or to learn more about our initiatives. Your support and engagement are crucial for driving positive change.

bottom of page